श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत: पंतप्रधान मोदी

अयोध्या : प्रभू श्रीराम (Shriram) अयोध्येत परतले असून आता ते तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण, हा क्षण आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे.

Ayodhya

श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत: पंतप्रधान मोदी

मंगलमय वातावरणात अयोध्येत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा

अयोध्या : प्रभू श्रीराम (Shriram) अयोध्येत परतले असून आता ते तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण, हा क्षण आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे. राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर देशातल्या लोकांमध्ये रोज एक नवा विश्वास निर्माण होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. साधुसंतांच्या उपस्थितीत आणि मंगलमय वातावरणात राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेवेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagawat) आदी मान्यवर हजर होते.  हा कार्यक्रम होत असताना साऱ्या देशात दिवाळीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 

आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्याचा वारसा आज मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करत असून अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आणखी हजार वर्षांनीही आजची ही तारीख लक्षात ठेवली जाईल. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमान गढीलाही प्रणाम करतो. माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही नमन करतो.

प्रभू रामाची माफी मागतो

आज मी प्रभू रामाची माफी मागतो असे भावुक शब्दात सांगून मोदी म्हणाले की, आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच एवढी वर्षे हे काम करू शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरून काढली असून मला विश्वास आहे की, प्रभू राम आपल्याला माफ करतील. त्यावेळी रामाला १४ वर्षे वनवास सहन करावा लागला. या युगात आपल्याला शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये रामाचं चित्र आहे. रामाचे मंदिर न्यायिक पद्धतीनेच उभं राहिलं आहे. आज सगळा देश दिवाळी साजरी करतो आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest