सुरक्षितता आणि न्याय प्रक्रिया महत्त्वाची

तपासात गोपनीयतेला स्थान नाही, बुरख्याशिवाय ठाण्यात बोलावल्याची तक्रार करणाऱ्या महिलेस उच्च न्यायालयाने फटकारले

Safetyanddueprocessareimportant

सुरक्षितता आणि न्याय प्रक्रिया महत्त्वाची

#नवी दिल्ली

एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बुरखा घातलेला नसताना पोलिसांनी ठाण्यात नेले, असे म्हणत एका मुस्लीम महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात

धाव घेतली होती. महिलेच्या तक्रारीवर न्यायालयाने धार्मिक प्रथा किंवा व्यक्तिगत आवड असे कारण पुढे करुन गोपनीयतेला स्थान दिल्यास त्याचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो. यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पोलीस तपासामध्ये गोपनीयतेला काहीही स्थान नाही. सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तीची ओळख महत्त्वाची आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने महिलेचा दावा फेटाळला आहे. न्यायालयाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना कोणतेही निर्देश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मुस्लीम महिलेने तिला बुरख्याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये तिची परेड काढण्यात आल्याचेही महिला म्हणाली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी पोलिसांना कोणतेही निर्देश न देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी अधिक संवेदशील व्हावे,  यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ता महिलेने मागणी केली होती की, ज्या महिला धार्मिक प्रथा आणि स्वत:च्या आवडीनुसार बुरखा किंवा तत्सम पर्दा करतात. त्यांच्याप्रति पोलिसांना संवेदनशील केले जावे. उच्च न्यायालयाने यावर महत्त्वाची टिप्पणी केली. न्यायालय म्हणाले की, पोलीस तपासामध्ये गोपनीयतेला काहीही स्थान नाही. सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तीची ओळख महत्त्वाची आहे.

नेमके काय प्रकरण?

रेशमाच्या तीन भावांनी दोन व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेशमाला ठाण्यात नेले होते.  पोलिसांच्या दाव्यानुसार, मारहाणीच्या घटनेदरम्यान रेशमा बाल्कनीतून सर्व काही पाहत होती. त्यावेळी तिने तोंड झाकले नव्हते. पोलिसांचा असाही दावा आहे की, स्वत: रेशमाने ठाण्यात नेण्याची मागणी केली होती. कारण, तिला प्रति हल्ल्याची भीती होती. रेशमाच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, पोलिसांनी बळजबरीने रेशमाला चांदनी महल ठाण्यात नेले. रेशमा ही पर्दा करणारी महिला आहे हे पोलिसांना माहिती होते. तरी देखील दिला पर्दा करण्यास वेळ देण्यात आला नाही.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest