महात्मा गांधीजींच्या हत्येची नव्याने चौकशी करा

नवी दिल्ली: महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्याने महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

संग्रहित छायाचित्र

रणजित सावरकरांनी केली केंद्र सरकारकडे मागणी, हत्या नथुरामच्या गोळीने झाली नसल्याचा दावा

नवी दिल्ली: महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्याने महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही, असा दावा रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी केला आहे. तसेच गांधींच्या हत्येमागे कोण आहेत हे शोधण्याची, त्यासाठी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणीही सावरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी लिहिलेल्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकाचे नुकतेच दिल्लीत प्रकाशन झाले. या पुस्तकात त्यांनी एक दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (३० जानेवारी)  पुण्यतिथी आहे. ३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. मात्र आता रणजीत सावरकर यांनी महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झालेली नसून त्यांना संपवणारे कोणी अन्य असल्याचा दावा केला आहे. महात्मा गांधी यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गांधींच्या हत्येमागे कोण आहेत हे शोधण्याचे आवाहनही रणजीत सावरकर यांनी केले आहे. या पुस्तकामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गांधीजींचा मृत्यू आणि नथुरामचा गैरसमज

नथुराम गोडसे फक्त आरएसएसचा स्वयंसेवक होता. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेवर बंदी घालण्यात आली होती. 'हे राम'चे नाव घेऊन मोठे पाप दाबून ठेवण्यात आले. ते या पुस्तकातून समोर येईल असाही दावा सावरकर यांनी केला. नथुरामच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती. नथुराम गुन्हेगार नव्हता. तो पत्रकार होता. त्यामुळे त्याचा निशाणा लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पाहता गोडसेने महात्मा गांधींना मारले नाही. गांधीजी दुसऱ्यांच्या गोळ्यांना बळी पडले.  ते कोण होते ते तपासायला हवे. माझे आवाहन आहे, सरकारने यावर एक आयोग नेमावा. गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी सुरू करावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest