‘युवकाला केलेल्या मारहाणीचा अभिमान’

शिवजयंतीला केलेल्या बेदम मारहाणीबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी केले जाहीर समर्थन

 "Proudofbeatingayoungman

‘युवकाला केलेल्या मारहाणीचा अभिमान’

#बुलढाणा

वेगवेगळ्या विधानांनी आणि कृत्यांनी नेहमी वादात अडकणार शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) आमदार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी युवकास केलेल्या मारहाणीचा व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून शनिवारी त्याची चर्चा रंगली होती. या बेदम मारहाणीचा आपणास अजिबात पश्चाताप होत नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे आमदार संजय गायकवाड जाहीर केले आहे. 

सोशल मीडियावर गाजत असलेल्या मारहाणीच्या घटनेवर शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांनी मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याचे स्पष्टीकरणही दिले. याबाबत ते म्हणाले की, बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीतील माता-भगिनीवर चाकूने हल्ला करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याबाबत कल्पना दिली होती. पोलिसांना हे टोळके मिरवणुकीत सापडले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले. त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्याला मारहाण केली. माता-बहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती. एवढेच नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणीही सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असेही त्यांनी ठासून सांगितले. कोणाला मारहाण केली हा प्रस्न नसून पोलीस हजर असताना कायदा हातात घेण्याचा अदिकार आमदारांना कोणी दिली असा प्रश्न आता काहीजण विचारत आहेत. 

यापूर्वी आपण केलेल्या वाघाच्या सिकारीतील वाघाचा दात आपण आपल्या गळ्यातील माळेत घातला असल्याचा धक्कादायक दावा गायकवाड यांनी केला होता. त्याबाबत गायकवाड म्हणाले की, माझ्या विधानावरून वन विभागाने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच माझ्या गळ्यातील कथित वाघाचा दंत जप्त केला. मात्र तो दात वाघाचा नसून प्लास्टिकचा आहे. हा दात प्लास्टिकचा    असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. मोताळा तालुक्यातील जमीन ताबा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. ते रद्द करण्यासाठी आपण लवकरच ‘हायकोर्टा’त जाणार असल्याची माहितीही आमदारांनी यावेळी दिली. त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय व चौबे यांच्यातील आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest