आता ईएमआय घ्या आणि लग्न करा
#मुंबई
तरुण वयातल्या मुलांकडे पुरेसा पैसा आला की ते लग्नाचा विचार करतात. एकूणच काय तर आर्थिक स्थैर्य हा विवाहासाठी महत्तम मुद्दा असतो. मात्र आता पुरेसा पैसा नसला तरीही लग्नावाचून राहण्याचे कारण नाही. हातात पैसे नसतानाही तुम्हाला मनसोक्त पैसे खर्च करत विवाहसोहळा पार पाडता येणार आहे.
जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल पण पुरेसा पैसा नसेल तर काळजी करू नका कारण आता एक नवीन सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही पैसा नसताना धुमधडाक्यात लग्न करू शकता. अनेकजण मुलीच्या लग्नासाठी आपल्या आयुष्यभराची पुंजी कामाला लावतात तर काहीजण लग्नासाठी कर्ज घेत कर्जबाजारी होतात. कारण पैशांशिवाय लग्न हे अशक्य असते. लग्न म्हटले की पैसा हा आलाच. लग्नासाठी तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही ईएमआयवर लग्न करू शकता. मॅरी नाऊ, पे लॅटर (एमएनपीएल) सुविधेमुळे हे सहजशक्य आहे. आतापर्यंत तुम्ही ईएमआयवर ऑनलाइन शॉपिंग, घर, सोने, गाडी किंवा वस्तू खरेदी केली असतील पण आता बाय नाऊ पे लेटर फॅसिलिटीमुळे तुम्ही ईएमआयवर लग्नही करू शकता.
फिनटेक कंपनी संकषने या सुविधेसाठी रेडिसन हॉटेलसोबत करार केला आहे. कंपनीच्या मते, येत्या काही दिवसात ही सुविधा संपूर्ण देशात सुरू करण्याचा प्लॅन सुरू आहे. या फॅसिलिटीमध्ये वेडिंग स्पेस रेडिसन हॉटेलमध्ये मिळणार. कंपनीचा विचार एमएनपीएल स्कीम देशभरात राबवण्यात येणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश दहियांच्या मते, आतापर्यंत त्यांच्याकडे फ्लाय नाउ, पे लेटर होते, त्यानंतर त्यांच्याकडे सेल नाऊ पे लेटर होते, आता त्यांनी रेडिसनसोबत मिळून स्टे नाउ पे लेटरची सुविधा सुरू केली आहे. कंपनीच्या मते, ही सुविधा संपूर्ण देशात सुरू करण्याचे नियोजन आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत ही फॅसिलिटी रेडिसनच्या सर्व हॉटेलमध्ये सुरू होणार. कंपनीनुसार या स्किमद्वारे कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त २५ लाखापर्यंतचा निधी कर्जाने घेऊ शकते. हा निधी ६ ते १२ महिन्यात परत करणे अपेक्षित आहे. वृत्तसंस्था