New Motor Vehicle Act: ट्रक चालक आंदोलन का करतायेत? चालकांचा संप मागे!

पुणे: भारत सरकारने (government of india) नव्याने आणलेल्या भारतीय न्याय संहितेमध्ये (Bhartiya Nyaya Samhita) केलेल्या तरतुदींविरोधात ट्रक चालकांची ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.

Truck Drivers Protest

संग्रहित छायाचित्र

नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरातून विरोध

पुणे: भारत सरकारने (government of india) नव्याने आणलेल्या भारतीय न्याय संहितेमध्ये (Bhartiya Nyaya Samhita) केलेल्या तरतुदींविरोधात ट्रक चालकांची ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा हा कायदा असून याला राज्यभरातून आणि देशभरातून विरोध केला जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलने केली.  पुण्यातूनही ट्रक आणि टँकर चालकांच्या संघटनांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे या कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामुळे पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन त्याची कमतरता भासेल म्हणून ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर लोकांनी रांगा लावल्या होत्या.

काय आहे नवीन मोटार वाहन कायदा? (New Motor Vehicle Act)

१) ट्रकमुळे एखादा व्यक्ति जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे. 

२) रुग्णालयात न नेल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळल्यास १० वर्षां पर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईन. 

३) नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ७ लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद आहे. 

केंद्र सरकारच्या या नवीन मोटार वाहन कायद्यामुळे ट्रकचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून राज्यभर ट्रकचालक ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचेही दिसून आले. या कायद्यामुळे चालकांचे मनोधैर्य खचेल अशीही भीती असल्याचा दावा ट्रक चालकांच्या संघटनांनी केला.

केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक पार पडली. त्यात हिट अँड रनचा कायदा लागू झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. ट्रक आणि टँकर चालकांनी आता कामावर यावे असे आवाहन या बैठकीनंतर करण्यात आले. त्यानंतर ट्रकचालकांना आपला संप मागे घेतल्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर ट्रान्सपोर्ट संघटनांनी ट्रकचालकांना कामावर परत येण्यास सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest