संग्रहित छायाचित्र
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक किस्से, त्यांच्या आवडी निवडी समोर येऊ लागल्या आहे. 'संयमी, शांत, अतिशय प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे नेते' अशी जगभरात ख्याती असणारे मनमोहन सिंह हे शाकाहारी होते. पण त्यांना जेवणात मासा खुप आवडायचा. खाद्यसंस्कृतीबद्दल त्यांच्या अनेक आवडीनिवडी होत्या.
माजी पंतप्रधानांना कमी पण चविष्ट खाणे आवडायचे असे, मनमोहन सिंह यांना जवळून पाहणारे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी सांगितले आहे. बारु यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे जेवण खुप कमी असायचे. दुपारच्या जेवणात ते केवळ 2 चपात्या खात असत.
डॉ. मनमोहन सिंह होते रेस्पिरेटरी डिसीजने त्रस्त; हा आजार नेमका आहे तरी काय?
तसेच बारु पुढे म्हणाले, माजी पंतप्रधानांना शाकाहार आवडायचे. पण जेवणात मासा लागत असे. इतकेच काय तर त्यांना जेवणानंतर कॉफी पिण्याची आवड होती. त्यांचा जेवणातील चपाती किंवा पराठा हा खास भाग होता. यासोबतच त्यांना कढी, लोणचं खाण्याची आवड होती.
मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पंजाबी जेवणाची आवड होती. दोन महिन्यातून ते कुटुंबासह बाहेर जेवायला जात असत. यावेळी दिल्लीतील बंगाली मार्केटमधील चाट ही त्यांची फेव्हरेट डिश होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.