संग्रहित छायाचित्र
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी दिल्ली येथे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज (शनिवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता त्यांची अंत्ययात्रा काँग्रेस मुख्यालयातून सुरू झाली. दिल्लीतील निगमबोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. तसेच गृहमंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात डॉ. मनमोहन सिंह यांचे स्मृतिस्थळ उभारले जाणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. माजी पंतप्रधान सिंह यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात होती. मनमोहन सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणीच त्यांचे स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. गृहमंत्रालयाच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून घ्यावे. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल. विस्वस्त मंडळ स्थापन करून डॉ. मनमोहन सिंह यांचे स्मृतिस्थळ उभारले जाईल असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.