भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंह यांची भारतातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते. मनमोहन सिंह यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जाते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. 'संयमी, शांत, अतिशय प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे नेते' अशी त्यांची जगभरात ख्याती होती. विशेष म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा खास पैलु म्हणजे त्यांची निळी पगडी. त्यांच्या निळ्या पगडीने अनेकांचे लक्ष वेधलं होते.
त्यांच्या निळ्यापगडी विषयी अनेकांना प्रश्न उपस्थित होत असतं. नेहमी सिंह निळी पगडीच का घालतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असायचा. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता.
निळ्या पगडीमागचं नेमकं सीक्रेट काय?
एका कार्यक्रमात बोलताना सिंह म्हणाले, मी केंब्रिजमध्ये शिकत होतो तेव्हा मी नेहमी निळी पगडी परिधान करायचो. त्यावेळी माझ्या मित्रांनी माझे 'ब्लू टर्बन' असं टोपणनाव ठेवलं. तसेच ते पुढे म्हणाले होते की, निळा रंग हा माझा आवडीचा रंग आहे. त्यामुळेच नेहमी सिंह निळ्या रंगाची पगडी परिधान करायचे.
सिंह यांनी त्यांच्या पगडीचे रहस्य तेव्हा सांगितले, जेव्हा त्यांना केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची डॉक्टरेट मिळाली होती. या सोहळ्यादरम्यान, एडिनबर्गचे तत्कालीन ड्यूक आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांनी त्यांच्या पगडी आणि त्याच्या रंगाकडे लक्ष वेधले.
विद्यार्थीदशेपासून ते पंतप्रधान होईपर्यंत सिंह यांनी नेहमीच निळ्या रंगाची पगडी परिधान केली. त्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले तरी त्यांनी निळा रंग डोक्यावर काय ठेवला.