संग्रहित छायाचित्र
नविन वर्षाच्य सुरुवातील लाडक्या बहिणींना सरकारनं मोठ गिफ्ट दिलं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरात मोठं बदल करत सर्वसामान्य ग्राहकांना सरकारने दिलासा दिला आहे. एलपीजी सिलेंडर आजपासून 14.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सिलेंडरच्या दरात झालेली ही कपात संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे.
गॅस सिलेंडरच्या दरात जो बदल करण्यात आला तो 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरमध्ये करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जाणून घ्या LPG दरातील बदल
मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या दरात 16 रुपयांनी घट झाली आहे. येथे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1771 रुपयांऐवजी 1756 रुपयांना मिळणार आहे. मुंबईनंतर दिल्लीत आज 1 जानेवारीपासून 19 किलोचा इंडेन एलपीजी सिलेंडर 1804 रुपयांना मिळणार आहे.
गेल्या महिन्यात हा सिलेंडर 1818.50 रुपयांनी विकला जात होता.
घरगुती सिलेंडर दरात कोणताही बदल नाही
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही मुंबईत घरगुती सिलेंडर हा 802.50 रुपयांना तर चेन्नईमध्ये 818.50रुपयांना हा सिलेंड मिळतो.