Sarasvati River Rajsthan : काय सांगता! राजस्थानात प्रकटली लुप्त सरस्वती नदी? जमिनीतून उसळणाऱ्या फवाराऱ्याचा व्हिडिओ व्हायरल; तज्ज्ञांनी फेटाळला दावा

जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर येथील मोहनगड कालव्याच्या परिसरात सोमवारी बोअरवेलसाठी केल्या जाणाऱ्या ड्रिलिंग दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅस आणि पाणी बाहेर आल्याचा प्रकार समोर आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 1 Jan 2025
  • 04:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर येथील मोहनगड कालव्याच्या परिसरात सोमवारी बोअरवेलसाठी केल्या जाणाऱ्या ड्रिलिंग दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅस आणि पाणी बाहेर आल्याचा प्रकार समोर आला. या पाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यादरम्यान या पाण्याचा संबंध पुरातन सरस्वती नदीशी असल्याचा दावा करण्यात आला. 

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती, दरम्यान हा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान जमिनीतून बाहेर पडणाऱ्या या पाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यादरम्यान या पाण्याचा संबंध पुरातन सरस्वती नदीशी असल्याचा दावा राजस्थान राज्य भूजल विभागाचे वरिष्ठ हायड्रो-जिओलॉजिस्ट डॉ नारायण दास इनाखिया यांनी फेटाळला आहे. तसेच त्यांनी नमूद केले की याचे मूळ वेदपूर्व काळात तसेच लाखो वर्षे जुने असू शकते. तसेच अधिकार्यांचनी पाण्याबरोबर बाहेर पडणारे वायू हे ज्वलनशील नाहीत आणि यापासून कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

येथे बोअरवेलसाठी २८ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली ड्रिलिंग सुमारे ८५० फुट खोलपर्यंत गेल्यानंतर अचानक जमीन ढासळू लागली आणि प्रचंड दाबाने पाणी चार फुटांपर्यंत हवेत उडाले. उच्च दाबाने येणारा पाण्याचा हा फवारा पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. इतकेच नाही तर हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय अधिकार्यांघना हा परिसर रिकामा करावा लागला. दरम्यान जमिनीतून बाहेर पडणार्यार या पाण्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह नाथावत यांनी सांगितले की, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गळती थांबवण्यात यश आले. दरम्यान त्यांनी लोकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

मोहनगडचे उप-तहसीलदार ललीत चरण यांनी सांगितले की, ही गळती रविवारी रात्री १० च्या सुमारास आपोआप बंद झाली. मात्र तज्ज्ञांच्या मते ती पुन्हा कधीही सुरू होऊ शकते, अशावेळी यामधून विषारी वायूसारखे हानिकारक घटकही बाहेर पडू शकतात. ओएनजीसी अधिकार्यांहनी याची पाहाणी केली असून त्यांनी यामधून बाहेर पडणारे वायू विषारी किंवा ज्वलनशील नसल्याची माहिती दिल्याचेही चरण यांनी स्पष्ट केले. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

आर्टेसियन स्थिती सर्वाधिक दाबाखाली असते पाणी 
राजस्थान राज्य भूजल विभागाचे वरिष्ठ हायड्रो-जिओलॉजिस्ट डॉ नारायण दास इनाखिया यांनी या घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेला ‘आर्टेसियन स्थिती'असे म्हटले जाते. वाळवंटी प्रदेशात सँड स्टोनच्या थराखाली बंद जागेत पाणी साठलेले असते. जेव्हा या २००-मीटर जाडीच्या खडकात ड्रिलिंग करताना हे पाणी लागते तेव्हा जास्त दाबामुळे ते वरच्या बाजूला फेकले जाते. मोहनगड आणि नाचना समिती पंचायतीच्या इतर भागात ही घटना दिसून आली आहे, परंतु या घटनेची तीव्रता पूर्वीपेक्षा जास्त होती.

सुरुवातीला वेगाने बाहेर पडणारे पाणी हळूहळू कमी झाले. वाळवंटी प्रदेश असल्याने बरेचसे पाणी जमिनीत मुरले ज्यामुळे पूरासारखी स्थिती किंवा नुकसान झाले नाही. पण या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अपघात टाळण्यासाठी अधिकार्यां नी खबरदारी उपाय योजना केली.

 

Share this story

Latest