Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर-बाबरीप्रश्नी निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारीस राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना (Ramamurthy Pran Pratishtapana) कार्यक्रमाचे निमंत्रण राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींना देण्यात आले आहे.

Ram Mandir Pran Pratishtha

राम मंदिर-बाबरीप्रश्नी निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारीस राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना (Ramamurthy Pran Pratishtapana) कार्यक्रमाचे निमंत्रण राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींना देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रंजन गोगोई, (Ranjan Gogoi) शरद बोबडे, धनजंय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांच्यासमोर झाली होती. या पाच न्यायमूर्तींनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला. आता या पाचजणांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिल्याने ते २२ जानेवारीला अयोध्येत येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अयोध्येतील सोहळ्यासाठी देश-विदेशातील व्यक्तींना निमंत्रणे पाठवली आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाने येणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. राम मंदिर-बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, २.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामलल्लाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते. त्या जागेवर बोर्ड मशीद बांधू शकेल. ६ डिसेंबर १९९२ रोजी एका जमावाने बाबरी मशीद पाडली होती. यानंतर राम मंदिर आंदोलनाने वेगळे वळण घेतले होतं.

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी बालरुपातील रामाच्या मूर्तीची आणि शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या शाळिग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचं भूमिपूजन केलं होतं. आता याच मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच अयोध्यानगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी देशातील चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest