हाफ पॅन्ट आणि बनियनमध्ये फिराल तर...

सध्या ड्रेस कोडवरून देशात वाद सुरू आहेत. शाळांतील गणवेशावरून काही समुदायांनी आक्षेप घेतला आहे. काही मंदिरात स्वतंत्र ड्रेस कोड असतात. त्यावरून अधूनमधून बातम्या येत असतात. आता एका ग्रामपंचायतीने पुरुषांना हाफ पॅन्ट आणि बनियनमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करणारा ठराव पास केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 28 Jun 2024
  • 06:08 pm

संग्रहित छायाचित्र

हरियाणातील भिवानी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी घेतला पुढाकार, ग्रामपंचायतीने एकमुखाने पारित केला ठराव

नवी दिल्ली : सध्या ड्रेस कोडवरून देशात वाद सुरू आहेत. शाळांतील गणवेशावरून काही समुदायांनी आक्षेप घेतला आहे. काही मंदिरात स्वतंत्र ड्रेस कोड असतात. त्यावरून अधूनमधून बातम्या येत असतात. आता एका ग्रामपंचायतीने पुरुषांना हाफ पॅन्ट आणि बनियनमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करणारा ठराव पास केला आहे. 

गावातील तरुण जर हाफ पॅन्ट आणि बनियनमध्ये फिरताना दिसला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे या ग्रामपंचायतीने म्हटले आहे. अखेर या कठोर कारवाई मागे काय कारण आहे. याची तुम्हाला उत्सुकता असेल तर ते कारणही हटके आहे.

हरियाणातील भिवानी ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार जर गावातील तरुण हाफ पॅन्ट  आणि बनियनमध्ये फिरताना दिसले तर ग्रामपंचायत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे. हा ठराव एका महिला सरपंचाने केला आहे. 

या गावातील महिला सरपंच रेणू यांचे सासरे सुरेश कुमार यांनी सांगितले की, तरुण हाफ पॅन्ट घालून गावात फिरत असतात. त्यामुळे गावातील भगिनींना आणि मुलींना अतिशय लाजीरवाणे वाटते. त्यामुळे आपल्या सुनेने हा ठराव आणला होता. 

हा आदेश पाळला नाही तर अशा तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी बोलून त्यांना असे न करण्याबाबत समज दिली जाणार आहे. जर तरीही ते ऐकले नाही तर त्यावर ग्रामपंचायत स्वतंत्रपणे निर्णय घेईल असेही सुरेश यांनी सांगितले.

या आदेशाची पंचक्रोशीत चर्चा

या गावातील सरपंचांच्या आदेशाचे पालन होते की नाही याची तपासणी चौकीदारामार्फत केली जाणार आहे. या आदेशानंतर गुजरानी गावातील तरुणांनी हाफ पॅन्टमध्ये फिरणे बंद केले आहे. घरात युवकांनी जशी मर्जी तसे राहावे परंतु दुसऱ्यांच्या घरी किंवा गल्लीत फिरताना त्यांना पूर्ण फुल पॅन्टमध्ये फिरावे लागेल. या आदेशानंतर दुसऱ्या ग्रामपंचायतीचे देखील त्यांना फोन येऊ लागले आहेत. त्या पंचायतीदेखील त्यांच्या गावात हा नियम लागू करू इच्छित आहेत, असेही सुरेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान भिवानी गावची लोकसंख्या सात हजार आहे. या गावात १२५० घरे आहेत. गावात बॅंकेपासून शाळादेखील आहेत. याबद्दल या गावाच्या पोलिसांना काहीही माहिती नाही.  ग्रामपंचायतीने बहुमताने हा ठराव मंजूर केला आहे तर त्यात पोलीस हस्तक्षेप करू शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest