जगन्नाथाची संपत्ती किती? - तब्बल ४६ वर्षांनंतर उघडले ‘रत्नभंडार’ , कसा असणार नियंत्याचा खजिना?

ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील रथयात्रा अलीकडेच पार पडली. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणते रत्नभंडाराकडे. तब्बल ४६ वर्षांनी ओडिशातील रत्नभंडार खोलण्यात आले आहे. लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांमध्ये पुरीतील रत्नभंडार हा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनदेखील दिले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 15 Jul 2024
  • 11:48 am
National News, Sri Jagannath Temple, Rath Yatra,  Ratnabhandara,  Odisha's gem,  assembly elections, india, temple, god, lord jagannath

संग्रहित छायाचित्र

पुरी: ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील रथयात्रा अलीकडेच पार पडली. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणते रत्नभंडाराकडे. तब्बल ४६ वर्षांनी ओडिशातील रत्नभंडार खोलण्यात आले आहे. लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांमध्ये पुरीतील रत्नभंडार हा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनदेखील दिले होते.

ओडिशाचे कायदेमंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नभंडाराची दुरुस्ती आणि मोजणीसाठी विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे. रत्नांची मोजणी सुरू असताना रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असणार आहेत. १२ व्या दशकातील या मंदिराचा रत्नभंडार शेवटचा १९७८ रोजी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या खजिन्यात असलेले दागिने आणि रत्न याची मोजणी करण्यासाठी जवळपास ७२ दिवस लागले होते. मात्र, यंदा तंत्राच्या साहाय्याने मोजणीचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या कामाच्या वेळी देवाच्या दर्शनाच्या वेळेत काहीही त्रास होणार नाही.  

सर्पमित्र आणि वैद्यकीय पथक सज्ज
रत्नभंडार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी सांगितले की, रत्नभंडार दुपारी खोलण्यात येईल. रत्नभंडाराचे कुलूप चावीने उघडले गेले नाही तर कुलूप तोडण्यात येणार आहे. तसेच आतमध्ये सापांचा वावर असल्याने सर्प मित्रांना व वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे. तर अन्य एका सेवकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जण या प्राचीन मंदिरातील रत्नभंडारमध्ये काय आहे, हे पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र आत असलेल्या सापांमुळे काहीशी भीतीदेखील मनात आहे. जग्गनाथ हेरिटेज कॉरिडोर प्रकल्पाच्या सौंदर्यीकरणादरम्यान मंदिराच्या आसपास सापदेखील मिळाले होते. प्राचीन मंदिर असल्याकारणाने ठिकठिकाणी लहान लहान भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या भेगांमध्ये साप असू शकतात. त्यामुळे रत्नभंडार खोलण्यात येत असताना सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. असे म्हणतात की साप या खजिन्याचे रक्षण करतात.

खजिन्यात काय?
श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्नभंडाराची शेवटची मोजदाद १९७८ साली झाली होती. श्री जग्गनाथ मंदिर प्रशासनाकडून जारी झालेल्या एका माहितीनुसार रत्नभंडारमध्ये तीन कक्ष आहेत. त्यातील सर्वात आतील कक्षात ठेवलेले दागिने कधीच वापरण्यात आलेले नाहीत. तर, बाहेरील कक्षातील दागिने विशेष दिवस व सण यासाठी बाहेर काढले जातात. देवाच्या रोजच्या पूजेसाठी सर्वात पहिल्या कक्षातील दागिन्यांचा वापर केला जातो. सर्वात आतील कक्षात, ५० किलो ६०० ग्रॅम सोने आणि १३४ किलो ५० ग्रॅम चांदी आहे, तर बाहेरील कक्षात ९५ किलो ३२० ग्रॅम सोने आणि १९ किलो ४८० ग्रॅम चांदी आहे. वर्तमान कक्षात ३ किलो ४८० ग्रॅम सोने आणि ३० किलो ३५० ग्रॅम चांदी आहे.

गेल्या शतकात जगन्नाथ मंदिराचे रत्नभंडार १९०५, १९२६ आणि १९७८ मध्ये उघडण्यात आले होते. तेव्हा तेथील मोल्यवान वस्तूंची यादी करण्यात आली होती. १९७८ मधील एका सर्वेक्षणानुसार रत्न भंडारमध्ये १४९ किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि २५८ किलो चांदीची भांडी असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. १२,८३१ किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते, ज्यात मौल्यवान रत्नही होते. २२,१५३ चांदीची जड भांडी आणि इतर अनेक वस्तू होत्या. असे म्हणतात हे सर्व दागिने राजे-महाराजांनी देवाला दान केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest