'हिंदू मुली म्हणजे लुटीचा माल नव्हे'

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्दा अनेक वेळा उपस्थित झालेला आहे. संयुक्त राष्ट्रानेही गेल्या महिन्यात अल्पसंख्याक समाजातील महिला आणि मुलींचे रक्षण करण्यात पाकिस्तान सरकार कमी पडत असल्याचे स्पष्ट केले होते.

Danesh Kumar Palayani

'हिंदू मुली म्हणजे लुटीचा माल नव्हे'

अल्पसंख्याकांच्या धर्मांतर, अपहरणाबाबत पाक संसदेत हिंदू खासदाराने ठणकावले

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्दा अनेक वेळा उपस्थित झालेला आहे. संयुक्त राष्ट्रानेही गेल्या महिन्यात अल्पसंख्याक समाजातील महिला आणि मुलींचे रक्षण करण्यात पाकिस्तान सरकार कमी पडत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संसदेत एका हिंदू खासदाराने आपल्याच देशाला म्हणजे पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानच्या काही प्रांतांमध्ये स्थानिक गुंड आणि समाजकंटकांकडून हिंदू मुलीचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर होत असल्याचा मुद्दा खासदार दानेश कुमार पलायानी (Danesh Kumar Palayani) यांनी उपस्थित केला, तसेच पाकिस्तानचे संविधान आणि कुराण कुणाचाही धर्म बदलण्याचे अधिकार देत नसल्याचे त्यांनी ठामपणाने बजावले आहे.

खासदार दानेश कुमार पलायानी म्हणाले, "सिंध प्रांतात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. हिंदूच्या मुली या लुटीचा माल नाहीत की, कुणीही त्यांचे धर्मांतर करेल. दोन वर्षांपूर्वी प्रिया कुमारी नावाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. दोन वर्षांपासून सरकारने या प्रकरणातील आरोपीविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. काही गुंड आणि दरोडेखोर आपल्या देशाचे (पाकिस्तान) नाव धुळीस मिळवत आहेत. पाकिस्तानचे संविधान आणि कुराणही कुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याची परवानगी देत नाही"

पलायानी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा व्हीडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशाप्रकारे अल्पसंख्याकांची बाजू मांडण्याची पाकिस्तानातील ही अपवादात्मक बाब म्हणावी लागेल.

महिनाभरापूर्वीच संयुक्त राष्ट्रांमधील तज्ज्ञांनी पाकिस्तानमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. "पाकिस्तानमधील ख्रिश्चन आणि हिंदू मुली मोठ्या प्रमाणात अत्याचारास बळी पडत आहेत, त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जाते. अपहरण, मानवी तस्करी, बालविवाह आणि लैगिक अत्याचारासारखे गुन्हे त्यांच्या बाबतीत होत आहेत, असे मत अहवालात संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी मांडले। होते. अल्पसंख्याकांच्या मानवी अधिकारांचे होणारे उल्लंघन आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असेही संयुक्त राष्ट्रांनी ठणकावले होते. दानेश कुमार पलायानी यांनी संसदेत ज्या प्रिया कुमारी या मुलीचा उल्लेख केला, ती

मुलगी केवळ सहा वर्षांची आहे. या मुलीच्या अपहरणामागे सिंध प्रांतातील एका पुढाऱ्याचा हात असल्याचा संशय पलायानी यांनी व्यक्त केला. पलायानी म्हणाले की, आरोपीला अटक करण्याची सरकारमध्ये धमक नाही, त्यामुळे अल्पसंख्याकांना न्याय मिळत नाही.

बीबीसीने २०१४ साली दिलेल्या एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी अनेक ख्रिश्चन आणि हिंदू मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येते. कधी कधी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांचे लग्न लावून देण्यात येते. पाकिस्तानमध्ये कट्टरतावाद वाढू लागल्यामुळे देशातील १० टक्के अल्पसंख्याकांपुढे जगण्याच्या प्रश्न निर्माण झाला असल्याचे अहवालात म्हटले गेले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest