हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. २८) रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 29 Jun 2024
  • 01:10 pm
National News, Hemant Soren

संग्रहित छायाचित्र

रांची: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. २८) रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले.

याप्रकरणी सोरेन यांना ३१ जानेवारीच्या रात्री ईडीने अटक केली होती. पाच महिन्यांनंतर या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.  यावेळी तुरुंगाबाहेर समर्थकांनी सोरेन यांचे जोरदार स्वागत केले. त्यांना घेण्यासाठी त्यांची पत्नी कल्पना सोरेनही तुरुंगात पोहोचल्या. शुक्रवारी सकाळी त्यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.

१३ जून रोजी जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. गेल्या तीन दिवसांपासून न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर सोरेन यांच्या शासकीय निवासस्थानी मिठाई वाटण्यात आली.

मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचे पुरावे नाहीत : उच्च न्यायालय

जामीन देताना उच्च न्यायालयाने सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सोरेन पीएमएलए कायद्यांतर्गत जामीनाच्या दोन्ही अटी पूर्ण करतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest