भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू
उत्तर भारतातील अनेक भागांत पावसाने कहर केला असून मोठमोठे रस्ते, वाहने, इमारती, पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील व्यास नदीला मोठा पूर आला असून येथील ५० वर्षे जुना असलेला पूल वाहून गेला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील गुरूग्राम येथील इमारतीखाली पाणी साचलं आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे पडणे आणि वीज पडून ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक ११ मृत्यू झाले आहेत. याशिवाय यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये ६, दिल्लीत ३, जम्मू- काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Shocking Visuals from Manali, #HimachalPradesh
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) July 9, 2023
Monsoon is hitting hard pic.twitter.com/CXU4aOMsCG
सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, दिल्लीत गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन आज दिल्लीतील सर्व शाळा एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Water has entered the premises of Gurdwara Manikaran Sahib in Manali, and the main entrance passage of the Gurdwara Sahib has also been submerged under the heavy flow of water. #Manali #GurdwaraManikaranSahib https://t.co/bsDZ1MrUXq pic.twitter.com/T2SGSEuhHX
— Gagandeep Singh (@Gagan4344) July 9, 2023
पावसामुळे पाण्यात वाहून गेलेल्या इमारतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नदीच्या काठावर बांधलेली व्यावसायिक इमारत पाण्यात वाहून गेली. यावेळी इथे असेलेले SBI चे ATM सुद्धा लोकांच्या डोळ्यांसमोर वाहून गेले. हा प्रकार सुरू असताना लोक फक्त पाहातच राहिले आहेत.