Gas Price: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात कपात

मुंबई: नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) दरात १.५० ते ४.५० रुपयापर्यंत कपात झाली आहे. याआधी २२ डिसेंबर रोजी १९ किलो व्यावसायिक

संग्रहित छायाचित्र

घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल नाही

मुंबई: नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) दरात १.५० ते ४.५० रुपयापर्यंत कपात झाली आहे. याआधी २२ डिसेंबर रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३९.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. परंतु घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. 

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलेंडरच्या दरात सुधारणा करतात. त्यानुसार २०२४ च्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅसचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. परंतु केवळ व्यावसायिक गॅसच्या दरातच हे बदल झाले असून घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यानुसार आता मुंबईत १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर १७०८.५० रुपयांना मिळेल तर दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर १७५५.५० रुपये इतके झाले आहेत.

घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या दरात यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर मुंबईत ९०२.५० रुपये, दिल्लीत ९०३ रुपये, कोलकाता ९२९ रुपये तर चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये दराने मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest