समृद्धी महामार्गाच्या पुलावर भगदाड पडल्याने खळबळ

तात्पुरते कठडे उभारून वाहतूक वळवली; बांधकाम दर्जाविषयी प्रश्नचिन्ह

collapseonSamriddhihighwaybridge

समृद्धी महामार्गाच्या पुलावर भगदाड पडल्याने खळबळ

#अमरावती

राज्यानेच नव्हे तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील पुलावर नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावनजीक भलेमोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्याने समृद्धी महामार्गावरील बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

समृद्धी महामार्गावरील लोहोगाव पुलावर अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. प्रशासनाला याबाबतची तातडीने माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी भगदाड  पडलेल्या जागेवर तात्पुरते कठडे उभारून वाहतूक दुसऱ्या दिशेने वळवली. वेळीच या घटनेची माहिती मिळाल्याने संभाव्य अपघात टळला.

मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर–इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले असून हा २५ किमी लांबीचा टप्पा सोमवार, ४ मार्च रोजी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. मात्र, त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच पुलावर खड्डा पडल्याचे आढळले आहे.

समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरू होऊन अवघ्या १४ महिन्यांचा कालावधी झाला आहे. नागपूर आणि मुंबईला जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीचा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गावर आजवर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पुलाला भगदाड पडल्याने अपघातानंतर आता बांधकामाच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest