बालकामगारांची सुटका
राजस्थानच्या बालकल्याण विभागाने जयपूरच्या काडीपेटीच्या कारखान्यातून मंगळवारी आठ बालकामगारांची सुटका केली आहे. या मुलांचे पालक बिहारमधून उदरनिर्वाहाची साधने शोधत राजस्थानात येऊन स्थायिक झाली आहेत. जास्त मजुरीच्या लोभामुळे या मुलांनाही कारखान्यात पाठवत असल्याचे बाल कल्याण विभागाचे म्हणणे आहे.