पत्नीप्रेमासाठी सोडला देह!

पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने रुग्णालयातील आयसीयूमध्येच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी (१८ जून) टोकाचे पाऊल उचलले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 20 Jun 2024
  • 03:49 pm
Shiladitya Chetia

संग्रहित छायाचित्र

पत्नीच्या निधनानंतर आयपीएस अधिकाऱ्याची आत्महत्या, पत्नीवियोग सहन न झाल्याने संपवले जीवन

पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने रुग्णालयातील आयसीयूमध्येच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी (१८ जून) टोकाचे पाऊल उचलले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, त्यांची पत्नी कर्करोगाने ग्रस्त होती.

आसामचे पोलीस महासंचालक जी.पी. सिंग यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या मृत्यूची माहिती दिली. पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी आत्महत्या केली असे त्यांनी सांगितले.  शिलादित्य चेतिया यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पोलीस खात्यावर शोककळा पसरली असल्याचे जी. पी. सिंग यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेत २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी संध्याकाळी स्वतःचा जीव घेतला. डॉक्टरांनी मागील अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यानंतर काही वेळात त्यांनी आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण आसाम पोलीस कुटुंब शोकाकुल असल्याचे आसाम पोलीस प्रमुख म्हणाले आहेत.

हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर हितेश बरुआ यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे की, ती सुमारे दोन वर्षांपासून कर्करोगाशी लढत होती आणि तिच्यावर इतरत्र उपचारही झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून, तिच्यावर येथे उपचार सुरू होते. त्याने हॉस्पिटलमध्ये एक वेगळी खोली घेतली होती. अखेरच्या तीन दिवसांत आम्ही त्यांना प्रकृती खालावली असल्याचे कळवले होते. दुपारी साडेचार वाजता उपस्थित डॉक्टरांनी शिलादित्य चेतिया यांना तिच्या निधनाची माहिती दिली. डॉक्टर आणि एक नर्स त्यांच्यासोबत खोलीत होते. प्रार्थना करायची आहे असे सांगून त्यांनी सर्वांना बाहेर पडण्याची विनंती केली. सुमारे १० मिनिटांनंतर खोलीतून मोठा आवाज ऐकू आला.

२००९चे भारतीय पोलीस सेवा अधिकारी शिलादित्य चेतिया गेल्या चार महिन्यांपासून रजेवर होते. कदादित पत्नीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा ते सामना करत होते. त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते.  पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आसाम सरकारमध्ये सचिव होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी राज्याच्या तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून काम केले होते.  दरम्यान त्यांनी कोणत्या स्थितीत आत्महत्या केली यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest