संग्रहित छायाचित्र
आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका मोटार अपघात भरपाई प्रकरणात दिला आहे. या निकालामुळे मृतकांच्या नातेवाईकांना मिळणारी ९ लाखांची भरपाई ही १९ लाखांपर्यंत वाढवून मिळाली.
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा.
आधार कार्डवर चुकीची जन्मतारीख?
या मोटार अपघात प्रकरणात याचिकाकर्त्याला मृत व्यक्तीचे आधार कार्डवरील वय ४७ हेच सत्यमानून उच्च न्यायालयाने ९ लाख २२ हजार ३३६ रुपये नुकसान भरपाई दिली होती. परंतु मृतव्यक्तचे वय हे ४५ हे असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने मान्य करीत कुटुंबियांना १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला.