अनंत अंबानीच्या लग्नपत्रिकेवरून मथुरेत वाद

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे. लग्नपत्रिकेवरून ब्रजच्या पुजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. लग्नपत्रिका अर्पण केल्यानंतर परत घेतल्याचा आरोप काही मंदिरांच्या पुजाऱ्यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 16 Jul 2024
  • 11:20 am
\Anant Ambani, marriage, mukesh ambani, marriage certificate, ambani wedding, mumbai, luxurios wedding

अनंत अंबानीच्या लग्नपत्रिकेवरून मथुरेत वाद

मंदिराचे पुजारी म्हणतात... मंदिरात पत्रिका ठेवली, फोटो काढला, मग घेऊन गेले; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मथुरा: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे. लग्नपत्रिकेवरून ब्रजच्या पुजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. लग्नपत्रिका अर्पण केल्यानंतर परत घेतल्याचा आरोप काही मंदिरांच्या पुजाऱ्यांनी केला आहे.

पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘‘काही लोकांनी लग्नाचे कार्ड आणले होते. मंदिरात अर्पण केल्यानंतर त्यांनी ते कार्ड सोबत नेले. काही पुजारी म्हणतात की कार्ड कुठेच गेले नाही. ज्यांच्या नावाने ते आले, त्यांच्याकडे आहे.’’ असे सांगितले जात आहे की हे कार्ड खूप महाग होते. त्यात देवाच्या चार सोन्याच्या मूर्ती होत्या. याशिवाय एक मौल्यवान शालही कार्डमध्ये ठेवण्यात आली होती.

अनंत अंबानी यांच्या लग्नपत्रिका ब्रजचे बांके बिहारी मंदिर, गोवर्धनचे दांगटी मंदिर, मुकुट मुखारबिंद मंदिर जातीपुरा, मथुरेचे यमुना जी मंदिर, टटिया स्थान आणि इतर अनेक धार्मिक नेते आणि संतांना पाठवण्यात आल्या होत्या. कार्ड आणलेल्या लोकांनी मंदिरात कार्ड अर्पण केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओही बनवले.

मथुरेच्या यमुनाजी मंदिर आणि गोवर्धनच्या दानघाटी मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांच्यावर परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्यानंतर कार्ड परत घेतल्याचा आरोप केला. पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही लोकांनी अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका आणून परमेश्वराच्या चरणी ठेवली. काही वेळाने ते कार्ड परत घेऊन निघून गेले.

 विश्राम घाट यमुना मंदिर समितीचे संरक्षक आणि सध्या मंदिराचे पुजारी सुभाष चतुर्वेदी म्हणाले, ‘‘अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन काही लोक विश्राम घाट यमुना मंदिरात आले होते. ते एक ब्रीफकेससारखे कार्ड होते. कार्ड यमुनाजींच्या चरणी ठेवण्यास सांगितले, त्यांनी फोटो काढला आणि कार्ड उघडण्यास सांगितले. आम्ही कार्ड उघडले, त्या दरम्यान त्याने एक फोटो घेतला. यानंतर त्यांनी कार्ड परत करण्यास सांगितले. त्यांनी कार्ड परत मागितल्यावर आम्हाला ते आवडले नाही. आम्ही लगेच कार्ड परत केले. हा यमुनाजींचा घोर अपमान आहे.’’

मंदिराचे सेवक म्हणाले, ‘‘कार्डमध्ये यमुनाजी मंदिर विश्राम घाट असे लिहिलेले आम्ही पाहिले. ते अंबानी कुटुंबाचे कार्ड होते. मंदिराच्या नावाने निमंत्रण होते. मी स्वतः कार्ड उघडताना पाहिले. ज्यांनी हे केले ते चुकीचे आहे. कार्डच्या किंमतीमुळे हे केले गेले आहे.’’

कार्ड घेऊन आलेल्या व्यक्तींनी पुजाऱ्यांना लिफाफाही दिला, मात्र मंदिराच्या पुजाऱ्यांनी लिफाफा घेतला नाही. यमुनाजींचा अपमान करणाऱ्या लोकांकडून लिफाफा कसा घेऊ, असे पुजारी म्हणाले. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मंदिराचे पुजारी म्हणाले, ‘‘हा यमुनाजींचा अपमान आहे आणि ज्या लोकांनी हे केले आहे त्यांनी यमुना मंदिरात येऊन माफी मागावी. यमुनाजींचे कार्ड यमुनाजींच्या चरणी ठेवावे. हे निषेधार्ह असून आमचा विरोध आहे.’’ 

ही तर गिरीराजजींची फसवणूक...
दानघाटी मंदिराच्या पुजाऱ्यांनी अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका परत घेतल्याचा आरोपही केला आहे. मंदिराचे पुजारी रामेश्वर पुरोहित म्हणाले, ‘‘अंबानी कुटुंबाने गोवर्धन दानघाटी मंदिरासाठी कार्ड पाठवले होते. ज्याच्यासोबत काही लोक आले. मंदिरात आल्यावर त्यांनी ते कार्ड गिरीराजजींच्या समोर ठेवले आणि फोटो काढून परत घेतले.’’ रामेश्वर पुरोहित यांनी गिरीराजजींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest