सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भडकले
#नवी दिल्ली
आपल्या समस्यांवर तोडगा निघत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने अनेकदा नागरिक लहान-सहान प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच्या प्रक्रियेचा मार्ग टाळून थेट सुप्रीम कोर्ट गाठतात. अशाच एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच भडकले . त्याचबरोबर त्यांनी याचिकाकर्त्यांना आता कोणत्या स्थानकांवर रेल्वे थांबावी हा निर्णय आम्हीच घ्यायचा का, असा सवाल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता. या रेल्वेला जे थांबे आहेत त्यामध्ये एक अतिरिक्त थांबा देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका केरळमधील वकील याचिकाकर्त्यानं थेट सुप्रीम कोर्टात दाखल केली. ही याचिका सुनावणीसाठी आल्याने सरन्यायाधीश भडकले. ते म्हणाले की, आता कुठल्या स्टेशनवर रेल्वे थांबावी, हे पण आम्हीच ठरवावे असे तुम्हाला वाटते का? हे धोरणात्मक निर्णयाचं प्रकरण आहे, त्यामुळं ते निकाली काढण्यात येत आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वरील टिप्पणी केली.
यापूर्वी केरळ हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. त्यावेळी खंडपीठाने सांगितले होते की, रेल्वे कुठे थांबायची आणि ती कोणत्या स्थानकांवर असावी हे रेल्वे ठरवते. हा रेल्वेचा प्रशासकीय निर्णय आहे.