येडियुरप्पांवर पॉक्सोप्रकरणी आरोपपत्र

कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 29 Jun 2024
  • 12:31 pm
National News,  POCSO case

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, ७५ साक्षीदार

बंगळुरू: कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येडियुरप्पा यांच्यावरील आरोपपत्र सुमारे ७५० पानांचे असून त्यात ७५ लोकांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. यापूर्वी १७ जून रोजी सीआयडीने अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी येडियुरप्पा यांची चौकशी केली होती. तेव्हा येडियुरप्पा म्हणाले होते की, ‘‘काही लोकांना गोंधळ घालायचा आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही. प्रत्येकाला सर्वकाही माहित आहे. या षडयंत्रामागे कोण असेल, त्यांना जनता धडा शिकवेल.’’

बंगळुरूच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने याप्रकरणी येडियुरप्पांविरुद्ध १३ जून रोजी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने १४ जून रोजी अटकेला स्थगिती दिली होती. मात्र, येडियुरप्पा यांना सीआयडीसमोर हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते.

कर्नाटक उच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याबाबत आक्षेप घेतला होता. येडियुरप्पा हे माजी मुख्यमंत्री असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ते या प्रकरणात सहकार्य करत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना त्यांचे वय आणि तपासातील त्यांची सहकार्याची भूमिका लक्षात घेऊन कारवाई करावी, असे न्यायालयाने सुनावले होते.

येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे जारी केली होती. एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेने आतापर्यंत विविध लोकांविरुद्ध ५३ गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे २ फेब्रुवारीचा १६ मिनिटांचा व्हिडिओ, जो महिलेने तिच्या मृत्यूपूर्वी पोलिसांच्या हवाली केला होता. यामध्ये महिला आणि येडियुरप्पा यांच्यातील संभाषण आणि पोलीस आयुक्तांशी फोनवरील संभाषण ऐकायला मिळते.

येडियुरप्पा चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी २००७ मध्ये सात दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००८ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मे २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा तीन दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले. यानंतर ते जुलै २०१९ ते जुलै २०२१  पर्यंत चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. अनिश्चिततेनंतर त्यांनी २०२१ मध्ये राजीनामा दिला.

बलात्कार प्रकरणात मदत मागण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग?

यंदा २ फेब्रुवारी रोजी एक महिला तिच्या १७ वर्षांच्या मुलीसह डॉलर्स कॉलनीतील येडियुरप्पा यांच्या घरी बलात्कार प्रकरणात मदत मागण्यासाठी गेली होती. तिथे मुलीचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे.

१४ मार्च रोजी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पाॅक्सो आणि ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेने सांगितले की, तिने येडियुरप्पा यांना विनयभंगाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाला आहे की नाही याचा तपास करत आहोत. एफआयआरनुसार, महिलेने सांगितले की येडियुरप्पा यांनी माफी मागितली आणि या प्रकरणाबद्दल इतर कोणालाही सांगू नका म्हटले.

एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेचा (पीडित मुलीची आई) २६ मे रोजी मृत्यू झाला. त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्ण होत्या. आता मुलगा खटला लढत आहे. कर्नाटक डीआयजींनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest