टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी शेतात सीसीटीव्ही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील टोमॅटो पिकावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या १० दिवसांत शेतातून २५ किलो टोमॅटो चोरीला गेल्याने कॅमेरे लावावे लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 9 Aug 2023
  • 03:54 pm
टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी शेतात सीसीटीव्ही

टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी शेतात सीसीटीव्ही

#छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील टोमॅटो पिकावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या १० दिवसांत शेतातून २५ किलो टोमॅटो चोरीला गेल्याने कॅमेरे लावावे लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

 टोमॅटोच्या चोरीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकरी शरद रावते यांनी सांगितले. टोमॅटोचा भाव पूर्वी २२ ते २५ रुपये किलो होता, मात्र आता तो १६० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे.

 रावते यांचे ५ एकर शेत आहे, त्यापैकी १.५ एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली जात आहे.  यातून  ६ ते ७ लाख रुपये कमाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘लवकरच शेतात दुसरे पीक येणार आहे. कॅमेरे बसवण्यासाठी २२ हजार रुपये खर्च झाले आहेत. हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालतात, त्यामुळे मला वीज पुरवठ्याची चिंता नाही. मी माझ्या फोनवरून शेतीचे निरीक्षण करू शकतो,’’ असे त्यांनी नमूद केले. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest