बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता यांचा अपघातात मृत्यू

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर धडक

BRSMLALasyaNanditadiedinanaccident

बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता यांचा अपघातात मृत्यू

#हैद्राबाद

सिकंदराबाद कँटमधील बीआरएस (भारत राष्ट्र समिती) आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल भागात सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर आदळली. या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी रामाराव यांनीही नंदिताच्या निधनावर शोक व्यक्त केला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्विट केले की, 'कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.या अपघाताची काही फोटो समोर आली आहेत. त्यात लस्याच्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. आमदार लस्या नंदिता या अवघ्या ३६ वर्षांच्या होत्या. लस्या नंदिताच्या वडिलांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. यानंतर तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने लस्या नंदिता यांना सिकंदराबादमधून उमेदवारी दिली आणि ती जिंकली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नंदिता यांनी भाजप उमेदवाराचा १७ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest