अखेर पटनायकांच्या गडाला सुरुंग

लोकसभेसोबतच ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीचे निकालही हाती आले आहेत. राज्यात १४७ जागांसाठी मतदान पार पडले होते. या सर्वच्या सर्व जागांचे निकाल आले आहेत. यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोठा धक्का बसला आहे. नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जाताना दिसत आहे. तब्बल २४ वर्षांनंतर नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 5 Jun 2024
  • 05:17 pm
 Lok Sabha elections

अखेर पटनायकांच्या गडाला सुरुंग

#नवी दिल्ली : लोकसभेसोबतच ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीचे निकालही हाती आले आहेत. राज्यात १४७ जागांसाठी मतदान पार पडले होते. या सर्वच्या सर्व जागांचे  निकाल आले आहेत. यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोठा धक्का बसला आहे. नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जाताना दिसत आहे. तब्बल २४ वर्षांनंतर नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जात आहे. तर, ओडिशामध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे. लोकसभेत ओडिशातील २१ जागांपैकी १९ जागांवर भाजपला यश मिळाले आहे. तर बीजेडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसही फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.

ताज्या माहितीनुसार, भाजपने विधानसभेत ७६ जागा जिंकल्या आहेत. भाजपला उत्तर ओडिशात सर्वाधिक यश मिळताना दिसत आहे. ओडिशाच्या बारगड, कालाहाडी, बालंगीर, पुरी, संभळपूर आणि क्योंझर या भागात बीजेडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. ओडिशात सरकार बनवण्यासाठी ७४ जागांची गरज आहे. हा आकडा भाजपने पार पाडला आहे.

बहुमताचा आकडा गाठला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीला ११३ जागा मिळाल्या होत्या. तर २३ जागा जिंकून भाजप मुख्य विरोधी पक्ष बनला होता. मात्र, आता २४ वर्षांनी  नवीन पटनायक यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागणार आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी बीजेडीला मात्र फक्त ५७ जागांवर समाधान मानावे  लागले आहे. तर काँग्रेसचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. सीपीएमला एक जागा मिळताना दिसत असून दोन अपक्षही आघाडीवर आहेत.

पहिल्यांदाच भाजपचे सरकार

आलेल्या निकालावरून भाजप राज्यात पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे मोदी प्रचारसभांमध्ये सांगत होते. सध्याचे कल पाहता मोदी यांचे म्हणणे खरे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पटनायक एकेकाळी एनडीएचा भाग होते. २००९ नंतर ते एनडीएपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी ओडिशात आपल्या बळावर सत्ता आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही त्यांनी ओडिशात सत्ता आणली होती. या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

इंडिया आघाडी एनडीए इतर

४० ३९ १ - उत्तरप्रदेश

१० ३० ० - बिहार

२८ ० - मध्य प्रदेश

११ १४ ० - राजस्थान

३८ १ - तामिळनाडु

२७ २० ० - महाराष्ट्र

३२ १० ० - पश्चिम बंगाल

१९ ० - कर्नाटक

१ - तेलंगणा

२१ ० - आंध्र प्रदेश

१९ १ - ओडिशा

२५ ० - गुजरात

० - गोवा

१४ ४ - केरळ

१ - सिक्कीम

० - मणिपूर

० - नागालँड

० - अरुणाचल प्रदेश

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest