संग्रहित छायाचित्र
स्विगी ही फूड डिलिव्हरी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. पुढील काही काळात स्विगी आपले आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीओ शेअर बाजारात आणण्याआधी स्विगी कंपनीने आपले नाव बदलले आहे.
खरं तर स्विगीचे आधीचे नोंदणीकृत नाव नाव बंडल टेक्नॉलॉजीज प्रायवेट लिमिटेड (Bundl Technologies Pvt Ltd) असे आहे. मात्र शेअरहोल्डर्सचा एक ठराव करून हे नाव बदलण्यात आले आहे. बंडल टेक्नॉलॉजीज हे नाव बदलून कंपनीचे नाव आता स्विगी प्रायवेट लिमिटेड (Swiggy Private Limited) असे असणार आहे. शेअर बाजारात यामुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे.
आनंद कृपालू यांची नुकतीच स्विगीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर चेअरपर्सन म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढील काही काळात स्विगी आपले आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. बंडल टेक्नॉलॉजीज हे नाव बदलून स्विगी प्रायवेट लिमिटेड असे लोकप्रिय नाव केल्याने कंपनीला शेअर बाजारात फायदा होईल असा अंदाज आहे.