संग्रहित छायाचित्र
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या वाहतूक सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याच संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूमध्ये, चारचाकी वाहनात १० किमी अंतर कापण्यासाठी २८ मिनिटे १० सेकंद लागतात. पुण्यात हेच अंतर कापण्यासाठी २७ मिनिटे ५० सेकंद लागतात. याशिवाय नवी दिल्ली १२ व्या तर मुंबई १४ व्या स्थानावर आहे. १० किमी. अंतरासाठी नवी दिल्लीत आणि मुंबईत २१ मिनिटे २० सेकंद लागतात. जागतिक स्तरावर, ब्रिटनची राजधानी लंडन आणि आयर्लंडची राजधानी डब्लिन ही सर्वात वाईट रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेली शहरे आहेत.
आशियाई विकास बँकेच्या मते, शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी वाहनांची संख्या दर ६ वर्षांनी दुप्पट होत आहे.
दरवर्षी ४.४ कोटी लोक शहरी लोकसंख्येमध्ये सामील होत आहेत. आशियाई विकास बँकेच्या मते, विकास कायम ठेवण्यासाठी आशियाला २०३० पर्यंत वार्षिक अंदाजे १४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातील तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. आशियामध्ये दरवर्षी ४४ दशलक्ष लोक शहरी लोकसंख्येमध्ये सामील होतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.