तब्बल पावणे तीन किलोचा वडापाव

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे विषय आवडीने बघितले जातात. खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील लोक काही तरी हटके पदार्थ बनवून त्याचे व्हीडीओ करून आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न सध्या प्रकाशझोतात आला आहे. एका युवकाने तब्बल २.६५ किलो वजनाचा वडापाव तयार केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 03:07 pm
तब्बल पावणे तीन किलोचा वडापाव

तब्बल पावणे तीन किलोचा वडापाव

#अहमदाबाद

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे विषय आवडीने बघितले जातात. खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील लोक काही तरी हटके पदार्थ बनवून त्याचे व्हीडीओ करून आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न सध्या प्रकाशझोतात आला आहे. एका युवकाने तब्बल २.६५ किलो वजनाचा वडापाव तयार केला आहे.

दाबेलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कच्छमध्ये वडापावचीही मोठी चलती आहे. मुंबई स्टाइल वडापाव व्यतिरिक्त येथे कच्छ स्टाइल वडापावही मोठ्या आवडीने खाल्ला जातो. भूजच्या देव बुद्धभट्टीने तब्बल २.६५ किलोचा जम्बो वडापाव तयार केला आहे. या वडापावचे वजन पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. संदीप बुद्धभट्टी आणि त्यांचा मुलगा देव बुद्धभट्टी हे गेल्या सात वर्षांपासून भूजमध्ये वडापाव आणि भजीचा व्यवसाय करतात. काही तरी वेगळे करण्याचा विचार करीत यांनी जम्बो वडापाव तयार केला. तब्बल अडीच किलोचा वडापाव तयार करण्याचा त्याचा हा सातवा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या सहा प्रयत्नांत त्याच्या पदरी अपयश आले. सातव्यांदा त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात २.६५ किलोचा वडापाव तयार केला. ज्यात बहुतांश वजन वड्याचे आणि उर्वरित ६५० ग्राम वजन पावाचे भरते . त्याच्या या कामगिरीसाठी 'इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि सोसायटी प्लांट फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest