अकबर हा बलात्कारी राजा

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचे वक्तव्य, अभ्यासक्रमातील समावेश मानसिक गुलामगिरीच्या मानसिकतेतून

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 29 Feb 2024
  • 03:10 pm
Akbarisarapistking

अकबर हा बलात्कारी राजा

#जयपूर

बादशाह अकबर बलात्कारी सत्ताधीश होता. सुंदर मुलींना उचलून घेऊन जायचा. त्याचा समावेश अभ्यासक्रमात करायला नको. अकबराबाबत अभ्यासक्रमात काहीही शिकवता कामा नये, असे विधान राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी केले आहे. दिलावर म्हणाले की, अकबर महान वगैरे काहीही नव्हता. अकबर मीना बाजार लावत होता आणि महिलांना तसेच मुलींना उचलून घेऊन जायचा. त्यांच्यावर बलात्कार करायचा. अशा बलात्कारी राजाविषयी अभ्यासक्रमात काहीही शिकवता कामा नये, आजवर त्याच्या नसलेल्या उदारमतवादाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यामागे गुलामगिरीची मानसिकता कारणीभूत असल्याचेही दिलावर यांनी म्हटले आहे.

दरम्यान दिलावर यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदन दिलावर म्हणाले, अकबर दुष्कर्म करणारा होता, अशा माणसाला महान म्हणता येणार नाही. ज्या लोकांनी अकबराच्या महानतेबाबत लिहिले आहे ते गुलामगिरीच्या मानसिकतेतले होते. 

गुलामगिरीची मानसिकता असलेल्या लोकांनी अकबराच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात केला, असा दावाही दिलावर यांनी केला आहे.  मदन दिलावर हे काही दिवसांपूर्वीही चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शाळांमधल्या ड्रेस कोडबाबतही वक्तव्य केले होते.  

शाळांमध्ये ड्रेसकोड असला पाहिजे. जो कुणीही ड्रेस कोड पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ज्यामुळे मदन दिलावर चर्चेत आले होते. आता त्यांनी अकबर बलात्कारी होता त्याचा समावेश अभ्यासक्रमात करायला नको, असे विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.  दरम्यान शाळेत येताना कुणी तोंड झाकून येते, कुणी बुरखा घालून येते, कुणी ओढणीने तोंड झाकते. उद्या कुणी हनुमानाच्या वेशात आले तर चालेल का? असा प्रश्न मदन दिलावर यांनी विचारला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest