आदित्य एल १ ची सूर्याकडे य़शस्वी झेप, भारत नवा इतिहास रचणार

PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली असून त्याची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 2 Sep 2023
  • 12:02 pm

आदित्य एल १ ची सूर्याकडे य़शस्वी झेप, भारत नवा इतिहास रचणार

जगाचे लक्ष लागून राहिलेले ISRO चे Aditya L1 हे यान अवकाशात झेपावले आहे. PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली असून त्याची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणे सहज शक्य होणार आहे.

‘आदित्य एल१’ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. आदित्य एल १ मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.

विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest