तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क उद्ध्वस्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि दिल्ली पोलिसांची कारवाई; तमिळ चित्रपट निर्माता सूत्रधार; न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियात पुरवठा

drugtraffickingnetworkwortharoundtwothousandcroreswasdestroyed

तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क उद्ध्वस्त

नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन हजार कोटींच्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले जाणारे ५० किलो स्यूडोफेड्रिन रसायनही जप्त केले आहे. एनसीबीने सांगितले की, ‘‘अमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कचा मास्टरमाइंड हा तमिळ चित्रपट निर्माता म्हणून ओळखला गेला आहे. तो अद्याप फरार आहे. निर्माता आणि त्याच्या टोळीने अवघ्या तीन वर्षात सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केली आहे. अन्न पावडर आणि वाळलेल्या नारळात लपवून हे रसायन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मलेशिया येथे पाठवले जात होते.

‘‘अटक केलेल्या आरोपींनी गेल्या तीन वर्षांत एकूण ४५ स्यूडोफेड्रिन शिपमेंट पाठवल्या असल्याचे अमली पदार्थविरोधी एजन्सीसमोर मान्य केले. या शिपमेंटमध्ये अंदाजे ३,५०० किलो स्यूडोफेड्रिन होते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अयाची किंमत अंदाजे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ’’अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली.

 ज्ञानेश्वरसिंह म्हणाले, ‘‘अमली पदार्थविरोधी एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या संयुक्त पथकाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून कारवाई करून हे नेटवर्क उद्ध्वस्त केले. चार महिन्यांपूर्वी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की भारतातून वाळलेल्या नारळाच्या पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात लपवून स्यूडोफेड्रिन पाठवले जात आहे. यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनकडून माहिती मिळाली की या मालाचा स्त्रोत दिल्ली आहे.’’

संयुक्त टीमच्या अधिकाऱ्यांनी या लिंक जोडल्या आणि १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम दिल्लीतील बसई दारापुरा येथील एका गोदामावर छापा टाकला. छाप्यादरम्यान गोदामातून ५० किलो स्युडोफेड्रिन जप्त करण्यात आले. हे रसायन विविध धान्यांच्या फूड मिक्सच्या खेपेत लपवले जात होते. याप्रकरणी तामिळनाडूतील तीन जणांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली.

स्यूडोफेड्रिन म्हणजे काय?

स्यूडोफेड्रिन हे रसायन आहे, ज्यापासून मेथॅम्फेटामाइन तयार केले जाते. हे एक प्रकारचे ड्रग्ज असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या ड्रग्जची किंमत दीड कोटी रुपये प्रति किलो आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे स्यूडोफेड्रिन असेल किंवा त्याचा व्यापार केला असेल तर त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest