पश्चिम बंगालमध्ये १७ लाख 'बनावट' मतदार
#कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी नुकतीच राज्यातील सुमारे १७ लाख बनावट मतदारांची यादी भारतीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. अधिकारी बुधवारी (२८ फेब्रुवारी) 'बनावट' मतदारांची यादी असलेल्या २४ बॅग घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ओळखलेल्या बनावट मतदारांची नेमकी संख्या १६,९१,१३२ असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या यादीत मृत मतदारांची तसेच इतरत्र स्थलांतरित झालेल्यांची नावे असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. अनेक ठिकाणी यादीत नावे आल्याचीही उदाहरणे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मतदारांची संख्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील फरकाइतकीच असल्याचा दावाही त्यांनी केला. सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, १४,२६७ पानांची कागदपत्रे जमा करण्याव्यतिरिक्त, आम्ही डिटेल्स पेन-ड्राइव्हमध्ये संग्रहित सॉफ्ट-कॉपी स्वरूपात निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. निवडणूक आयोगाची टीम मार्चमध्ये पश्चिम बंगालला भेट देणार असून सर्व राजकीय पक्षांसोबत बैठका घेणार आहे. या अनियमिततेबाबत आम्ही संपूर्ण सहकार्य या टीमला करू. तथापि, तृणमूल काँग्रेस नेतृत्वाने हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे.