संग्रहित छायाचित्र
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतने प्रतीक बब्बरला त्याची एक इच्छा सांगितली होती. ‘छिछोरे’चे शूटिंग संपवून त्याला एकट्यालाच अंटार्क्टिकाला जायचे होते. मात्र सुशांतचीह ही इच्छा अपुरीच राहिली.
अलीकडे ‘ख्वाबों का झमेला’ या चित्रपटासाठी दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सुशांतसिंग राजपूतबद्दल सांगितले आहे. प्रतीकने सुशांतसोबत ‘छिछोरे’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत होता, तर प्रतीकने नकारात्मक भूमिका साकारली होती. अलीकडेच एका मुलाखतीत प्रतीकने सोबत सेटवर वेळ घालवण्याबद्दल बोलताना सांगितले की, त्याने त्याच्या एका अपूर्ण इच्छेचा उल्लेख केला होता.
प्रतीकने या मुलाखतीत सुशांतला लिजेंड म्हटले आहे. त्याची आठवण आली का, असा प्रश्न विचारला असता, त्याला उत्तर देताना तो म्हणाला, ‘‘मी कधीच त्याच्या फार जवळ नव्हतो, पण कामाच्या वेळी जेव्हाही तो माझ्या जवळ असायचा तेव्हा त्याची आभा खूप मोठी असल्याचे जाणवायचे. तो अद्वितीय होता. ते अनोखा आणि हृदयस्पर्शी होता. मी त्याला लिजेंड म्हणेल.’’
सुशांत साॅफ हार्टेड होता. इतरांपेक्षा थोडा वेगळा होता. त्याला मी कधीच विसरणार नाही. आम्ही बास्केटबॉलच्या दृश्याची वाट पाहत होतो. आम्ही बास्केटबॉल हुपखाली बसलो होतो. बॉलशी खेळत होतो. तो अचानक मला म्हणाला, ‘‘यार मी अंटार्क्टिकला जात आहे.’’ जेव्हा मी त्याला याबद्दल सविस्तर विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मी अंटार्क्टिकाला जात आहे. तेथे मला एकटेच जायचे आहे.’’ दुर्देवाने त्याची ही इच्छा अपुरीच राहिली. सुशांतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. तपासादरम्यान त्याच्याजवळ एक डायरी सापडली, यामध्ये त्याने आपली विश लिस्ट लिहिली होती. त्या यादीत अशी जवळपास ५० कामे होती, जी पूर्ण करण्याचे स्वप्न अभिनेत्याने पाहिले होते. त्यांच्यामध्ये प्रवास, जागा आणि तरुणांसाठी नवीन व्यवसाय कल्पनांशी संबंधित कंपनी सुरू करणे असे अनेक मुद्दे होते. दुर्दैवाने, सुशांतने त्यापैकी केवळ १३ स्वप्ने पूर्ण केली आहेत. प्रतीकचा ख्वाबों का झमेला हा चित्रपट ६ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत सयानी गुप्ता आणि कुब्बरा सैत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.