...म्हणून परवीनसोबत ब्रेकअप

परवीन बाॅबी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली होती. तिचे नाव डॅनी डेन्झोंप्पा, कबीर बेदी आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशी जोडले गेले. कबीर बेदीसोबत अभिनेत्रीचे नाते फार कमी काळ टिकले.

Parveen Babi,Personal life,Danny Denzonappa, Kabir Bedi ,filmmaker ,Mahesh Bhatt

संग्रहित छायाचित्र

परवीन बाॅबी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली होती. तिचे नाव डॅनी डेन्झोंप्पा, कबीर बेदी आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशी जोडले गेले. कबीर बेदीसोबत अभिनेत्रीचे नाते फार कमी काळ टिकले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदी परवीनसोबतच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मोकळेपणाने बोलले.

कबीर बेदी म्हणाले, ‘‘मी नाही तर परवीननेच माझ्यासोबतचे नाते तोडले. तिचे मानसिक आरोग्य चांगले नसल्यामुळे ती मला सोडून गेली. परवीनला भीती होती की जर तिच्यावर वैद्यकीय उपचार झाले तर इंडस्ट्रीतील प्रत्येकाला तिची स्थिती कळेल, ज्यामुळे तिची कारकीर्द देखील संपुष्टात येईल. मला माहीत होते की जर तिने स्वत:वर उपचार केले नाही तर तिची प्रकृती आणखी बिघडेल. तिला सोडणारा मी नाही, तिने मला सोडले. पण लोकांनी मला दोष दिला. माझ्यावर आरोप करण्यात आले की, परवीनला मानसिक आरोग्याचा त्रास होत असल्याने मी तिला सोडले.’’

डॅनी आणि कबीर बेदीसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर, परवीन चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. महेश भट्ट आणि परवीन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. महेश आणि परवीन १९८०मध्ये वेगळे झाले. परवीनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच महेशचे लॉरेन ब्राइटसोबत लग्न झाले होते. आणि एका मुलाचे बापही होते.

 परवीन ही पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डरने त्रस्त होती. २००५ मध्ये परवीनचा मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर तिचा मृतदेह घरातून सापडला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story