जेवणासाठीही संघर्ष

मनोज बाजपेयीला बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्याने तो काळ आठवला जेव्हा त्याला जेवणासाठीही लोकांची फसवणूक करावी लागली. त्याने सांगितले की, एक वेळ अशी होती की त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 14 Nov 2024
  • 04:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मनोज बाजपेयीला बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्याने तो काळ आठवला जेव्हा त्याला जेवणासाठीही लोकांची फसवणूक करावी लागली. त्याने सांगितले की, एक वेळ अशी होती की त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते.

स्ट्रगलच्या काळात दोन वेळच्या जेवणाची सोय करणे ही सर्वात मोठी समस्या होती, असे मनोजने सांगितले. तो म्हणाला, ‘‘मुंबईत मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.’’ संभाषणादरम्यान,  त्याने दिल्लीच्या कुप्रसिद्ध पावसाळ्यातील जीवनाची आठवण करून दिली. पावसाळ्यात घालवलेल्या आपल्या दिवसांची आठवण करून तो म्हणाला की आजही ते दिवस आठवून थरथर कापतो. यादरम्यान मनोजने तो मुखर्जी नगर येथील बरसाती येथे राहत असल्याचे उघड केले. तो म्हणाला की त्यावेळी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मी रेनकोट घालून राहायचो. रेनकोटचा फायदा म्हणजे ते स्वस्त आहेत. पण उन्हाळ्यात खूप उष्ण आणि हिवाळ्यात खूप थंड होते. अभिनेता म्हणाला, जर बाहेरचे तापमान ४० अंश असेल तर ते रेनकोटच्या आत ४५ अंशांसारखे वाटेल आणि ते नरकासारखे होते.’’

अनेक वर्षे दिल्लीत राहून, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना मनोजने आपल्या अभिनय कौशल्यावर काम केले आणि नंतर तो मुंबईला शिफ्ट झाला. संवादादरम्यान त्याने सांगितले की, ‘‘मी जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा मला थिएटरमधून पैसे मिळत नव्हते, पण तरीही मी व्यस्त राहिलो कारण मी दिवसाचे १८  तास काम करायचो. मी माझ्या मित्रांचा आभारी आहे, कारण त्यांनी मला दिल्लीत कधीही उपाशी झोपू दिले नाही. जर मी दुपारचे जेवण केले नाही तर माझे मित्र त्यांचे जेवण माझ्याबरोबर शेअर करत. पण, मुंबईत टिकून राहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.’’

काम न मिळाल्याने मी केवळ शारीरिकच नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्याही खचलो होतो. मुंबई हे खूप महागडे ठिकाण आहे, जिथे जेवण मिळेल की नाही याची शाश्वती नाही. जेव्हा मी कामासाठी प्रॉडक्शनच्या लोकांकडे जायचा तेव्हा ते हाकलून द्यायचे. पणध नंतर हळूहळू संधी मिळत गेली आणि संघर्षाचे दिवस मागे पडले. त्या दिवसांनी मला चांगला माणूस म्हणून घडवले, असे मनोजने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story