ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 10 Aug 2024
  • 12:18 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज (१० ऑगस्ट) कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय हे गेले दीड वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना आता व्यक्त केली जातेय. त्यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी - ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गेले दीड वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनीराहत्या घरे अखेरचा श्वास घेतला.

विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं. त्यांचं 'विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि 'खुमखुमी' हा कार्यक्रम त्यांचा कार्यक्रम खूप गाजले. यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’व ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप नावाजले.आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story