वाढदिवसानिमित्त सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिली 'यॉट', 100 आयफोन 15 प्रो पण वाटणार!

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाची दिलेली भेट सध्या चर्चेत आहे. एक पत्र लिहून सुकेशने जॅकलिनबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत तिचं कौतुक केलंय.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 12 Aug 2024
  • 01:59 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाची दिलेली भेट सध्या चर्चेत आहे. एक पत्र लिहून सुकेशने जॅकलिनबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत तिचं कौतुक केलंय. 

सध्या दिल्ली मधील एका तुरुंगात असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाची एक खास भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. सुकेशने जॅकलिनला एक 'यॉट' भेट दिलीय! रविवारी जॅकलिनने आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. सुकेशने गिफ्ट दिलेल्या या यॉटचं नाव 'लेडी जॅकलिन' असं असल्याची माहिती मिळत आहे. 2021 साली जॅकलिनने हीच यॉट पसंत केली होती.

सुकेशने जॅकलिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायनाड मधील भूस्खलनग्रस्तांना 15 कोटी रूपये आणि 300 घरं देणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच जॅकलिनच्या एका गाण्याच्या प्रमोशनसाठी 100 आयफोन प्रो 15 वाटणार असल्याची घोषणा केलीये.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story