श्वेता पेंडसे खाकीत

‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी या अभिनेत्रीने खास खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 5 Aug 2024
  • 01:35 pm
Entertainment news, 'A Perfect Murder', Author Niraj Shirwaikar and director Vijay Kenkare, murder mystery, tv show, Shweta Pendse in khaki, khaki uniform

संग्रहित छायाचित्र

‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी या अभिनेत्रीने खास खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार आहे.

आपल्या उत्तम अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे. बदामराजा प्रोडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत. गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचे खरे रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक . अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे महिला पोलीस निरीक्षक म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे.

खूप कमी सस्पेन्स नाटके मनाचा ठाव घेतात, नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत नाटकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू शकेल का? हे पाहणे नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटले की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग आहे, असे श्वेता म्हणाली.  गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचे मनोरंजन करत या नाटकाने आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचे खरे रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक.

अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story