आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व

सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केले आहे. सई आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक विषयांवर ती आपली मते ठामपण मांडते. सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. यात तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 11:49 am
Sai Tamhankar, Hindi cinema, outspokenness,  sex education, sexual pleasure, sai answered questions about feminism

संग्रहित छायाचित्र

सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केले आहे. सई आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक विषयांवर ती आपली मते ठामपण मांडते. सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. यात तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

मुलाखतीत सई ताम्हणकरला सेक्स एज्युकेशन कुठून मिळाले, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सई म्हणाली, “घरातून. मी लहान असतानाच मला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल शिकवण्यात आले. मला हेही शिकवले होते की कोणी ओळखीतले आहेत तर ते असे वागणार नाहीत असे कोणतेही निकष नाहीत. हा चांगला स्पर्श आहे व हा वाईट स्पर्श आहे हेच मला शिकवले होते. माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केला, त्यामुळे कदाचित या गोष्टी शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे. घराशिवाय शाळेत सेक्स एज्युकेशन दिले जायचे. हे दोन स्रोत होते, जे महत्त्वाचे होते.

सई म्हणाली, “मला वाटते की, आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते. खरे तर तो नात्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा दोन जण एका नात्यात असतात तेव्हा या गोष्टीकडे ते लक्षच देत नाहीत. नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नाते  ऑटो पायलट मोडवर चालले आहे व सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतो. यावर चर्चा करण्यासाठी दोघेही जोडीदार इच्छुक व पॅशनेट असणे गरजेचे आहे. आपण समान आहोत हे अजूनही समजावून का सांगावे लागते आहे.  ही वेळ केव्हा आली की गोष्टी मागाव्या लागत आहेत. अमूक लिंग असलेली व्यक्ती मजबूत आहे व अमूक लिंग असलेली व्यक्ती कमजोर आहे हे कोणी ठरवले  मला वाटते की स्त्री व पुरुष दोघांकडेही काही असे गुण आहेत जे एकमेकांकडे नाहीत. दोघेही एकत्र आल्यावर एक सुंदर टीम तयार होते. मी दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहते. त्यामुळे भेदभाव न करता दोन्हीकडे समानतेने पाहणे व समानतेने जगणे हेच खरे फेमिनिझम आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story