ऋतुजा थिरकली तमिळ गाण्यावर

मराठी सिनेसृष्टीसह आता हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये ऋतुजाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केले आहे. ही अभिनेत्री आता ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ऋतुजा वैजयंती ही भूमिका साकारत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 15 Jul 2024
  • 03:18 pm
Entertainment news,  Rituja Bagwe, Hindi entertainment world,  Rituja Vaijayanti,  Marathi cinema, dance.

संग्रहित छायाचित्र

मराठी सिनेसृष्टीसह आता हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये ऋतुजाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केले आहे. ही अभिनेत्री आता ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ऋतुजा वैजयंती ही भूमिका साकारत आहे.

ऋतुजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ऋतुजाचे इन्स्टाग्राम रील्सही अनेकदा चर्चेत असतात. आता अशीच एक डान्स रील घेऊन ऋतुजा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ऋतुजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक डान्स व्हीडीओ शेअर केला आहे. ऋतुजा अभिनेता अंकित गुप्ताबरोबर ‘कन्मणी’ या तमिळ गाण्यावर थिरकली आहे. ‘कन्मणी’ हे गाणे सध्या ट्रेंडिंग आहे. इन्फ्लूएसंर्ससह अनेक मराठी कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत. ‘माटी से बंधी डोर’फेम वैजूचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हीडीओत अंकित आणि ऋतुजाने हटके डान्स स्टेप करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऋतुजाने या डान्ससाठी खास काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातले आहे. अभिनेत्रीने केस खुले ठेऊन मागे गजरादेखील माळला आहे. तर अंकितनेदेखील तिला मॅच करत काळ्या रंगाचा सूट घातला आहे. 'आम्ही कसे वाटतोय'  असे कॅप्शन अंकितने या व्हीडीओला दिले आहे.

दरम्यान, ऋतुजाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ऋतुजाने याआधी ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सोबो फिल्म्स’ प्रोडक्शन हाऊस निर्मित ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत ऋतुजा प्रमुख भूमिका साकारत आहे.  या मालिकेत समिधा गुरू, सारिका नवाथे, अभय कुलकर्णी, रेशम असे मराठमोळे कलाकार या मालिकेत निर्णायक भूमिका साकारताना दिसत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story