संग्रहित छायाचित्र
इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्माला पहिली पसंती होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारला. अनुष्का म्हणते की जर तिने इम्तियाज अलीचा हा चित्रपट केला असता तर तिचे नक्कीच कौतुक झाले असते, कारण तो एक चांगला दिग्दर्शक आहे.
एएनआयशी झालेल्या संवादात अनुष्का शर्माला विचारण्यात आले की, ''तमाशा चित्रपट न केल्याबद्दल काही पश्चात्ताप आहे का?'' यावर ती म्हणाली, "मी हा चित्रपट नाकारला होता कारण या चित्रपटाची कथा बहुतांशी रणबीर कपूरच्या व्यक्तिरेखेवर आधारित होती. मी हा चित्रपट पाहिला नाही. पण हो, जर मी हा चित्रपट केला असता तर मला नक्कीच प्रशंसा मिळाली असती, कारण इम्तियाज अली एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम करणारा अभिनेता नेहमीच चांगला असतो. तो त्याच्या कलाकारांसोबत खूप चांगला आहे."
'तमाशा' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूरने वेदवर्धन साहनीची भूमिका साकारली होती, ज्याला कथाकथन आणि नाटकाची आवड असते. कॉर्सिकाच्या एकट्या सहलीत त्याची तारा माहेश्वरीशी भेट होते. यानंतर त्यांच्यात घट्ट नाते निर्माण होते. ही भूमिका दीपिका पदुकोणने साकारली होती. 'तमाशा' बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.