पंजाबी विकी कौशल मालवणी पदार्थांचा चाहता!

विकी कौशल सध्या त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मसान’, ‘सॅम बहादूर’, ‘संजू’, ‘उरी’, ‘राझी’ अशा अनेक चित्रपटांमुळे विकी घराघरांत लोकप्रिय झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:23 pm

संग्रहित छायाचित्र

विकी कौशल सध्या त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मसान’, ‘सॅम बहादूर’, ‘संजू’, ‘उरी’, ‘राझी’ अशा अनेक चित्रपटांमुळे विकी घराघरांत लोकप्रिय झाला. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून विकीने मोठे यश मिळवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने जुन्या आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या दिवसांमध्ये तो कशी मजा करायचा, त्याचे आवडीचे पदार्थ काय आहेत याबद्दल सांगितले.

विकी कौशलने अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली आहे. “कॉलेजमध्ये असताना वांद्रे परिसरात खूप फिरायचो, रात्री आम्ही मित्र – मित्र एकत्र भेटलो की, दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरात फिरायला जायचो, असे  विकी कौशलने सांगितले. रात्री शूटिंगवरून थकून घरी आल्यावर मला साधा डोसा, खोबऱ्याची चटणी, चिकन लॉलीपॉप विथ शेजवान चटणी हे पदार्थ खायला खूप आवडतात. याशिवाय मी मालवणी पदार्थांचा खूप मोठा फॅन आहे असेही विकीने सांगितले.

मालवणी पदार्थ मला खूप आवडतात आणि त्यातही मला बोबींल फ्राय खूप आवडतात ते मी नेहमी खातो. चित्रपटसृष्टीत मी यशस्वी झाल्यानंतर माझ्या घरी काहीच बदल झाला नाही. आई-वडिलांच्या वागण्यात मला कधीही वेगळेपणा जाणवला नाही. ते माझ्याशी पूर्वीप्रमाणेच वागतात. मी सामान्य कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो आहे, आजही आमच्या घरचे सर्व नियम मी आणि माझा भाऊ पाळतो, असेही विकी म्हणाला. दरम्यान, विकी कौशलच्या कामाबद्दल सांगायचे झालयास त्याचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तृप्ती डिमरी, एमी विर्क यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या चित्रपटातील “तौबा तौबा…” गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story