प्रभासला म्हटले जोकर, अर्शद वारसी झाला ट्रोल

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या 'कल्की' चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात प्रभासला जोकरसारखा दाखवण्यात आले आहे, असेही तो म्हणाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 20 Aug 2024
  • 10:29 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या 'कल्की' चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात प्रभासला जोकरसारखा दाखवण्यात आले आहे, असेही तो म्हणाला.

युट्युबर समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत अर्शदला जेव्हा विचारण्यात आले की त्याने नुकताच कोणता वाईट चित्रपट पाहिला, तेव्हा त्याने 'कल्की'चे नाव घेतले.

अर्शद म्हणाला, ‘‘मी जेव्हा 'कल्की' पाहिला तेव्हा मला तो आवडला नाही. मला खूप वाईट वाटतंय पण अमितजी…तो माणूस समजत नाही. मी शपथ घेऊन सांगतो, त्यांच्याइतकी पॉवर मला मिळाली तर आयुष्य चांगले होईल. ते आश्चर्यकारक, अविश्वसनीय आहेत.

बिग बी यांचे कौतुक केल्यानंतर अर्शदने प्रभासच्या भूमिकेवर टीका केली. ‘‘प्रभासला पाहून मला खूप वाईट वाटले. तो त्या चित्रपटात का होता, हेच मला समजले नाही. मला माफ करा पण तो जोकरसारखा दिसत होता,’’ असे तो म्हणाला.  

'कल्की'मध्ये प्रभास दुहेरी भूमिकेत दिसला होता. एकीकडे, तो भविष्यातील दानशूर शिकारी भैरव बनला. दुसरीकडे, तो 'महाभारत'मधील कर्णाच्या भूमिकेतही दाखवण्यात आला होता. या टीकेनंतर प्रभासचे  चाहते  अर्शदला चांगलेच ट्रोल करत आहेत. ‘‘अर्शदने नको ती चिंता करू नये. ‘कल्की’ फिल्मच्या पार्किंगचे कलेक्शन त्याच्या संपूर्ण करिअरच्या कलेक्शनपेक्षाही जास्त आहे,’’ असा टोला एका चाहत्याने लगावला. आणखी एका चाहत्याने कमेंट केली, ‘‘कुणीतरी सांगावं, अर्शदने दिलेला शेवटचा हिट चित्रपट कोणता होता...’’

 प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘कल्की’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात १,१०० कोटींची कमाई केली होती.  अर्शद हा वेब सीरिज 'असूर' आणि 'मॉडर्न लव्ह मुंबई'मध्ये दिसला होता. सध्या तो 'जॉली एलएलबी ३' मध्ये काम करत आहे. यामध्ये तो अक्षयकुमारसोबत दिसणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story