वाढदिवसाच्या दिवशी प्रभासची चाहत्यांना खास भेट

'रिबेल स्टार' अशी ओळख असलेल्या अभिनेता प्रभासने २३ ऑक्टोबरला आपला ४५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभात ने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 24 Oct 2024
  • 03:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

'रिबेल स्टार' अशी ओळख असलेल्या अभिनेता प्रभासने २३ ऑक्टोबरला आपला ४५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभात ने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. प्रभासने त्याच्या आगामी ‘द राजा साब’  (The Rajasaab) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. तसेच त्याने या चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली आहे.

जून महिन्यात प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन, प्रभास यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. मात्र प्रेक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. 'कल्की' नंतर प्रभासचा ‘द राजा साब’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

प्रभासने आपल्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केलेल्या पोस्टमध्ये प्रभासने १० एप्रिल २०२५ला ‘द राजा साब’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले आहे.   मारुती या प्रसिद्ध दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  प्रभासच्या या चित्रपटात निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम जोरात सुरू आहे. ‘द राजा साब’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.  या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटातील संगीत थमन यांनी दिले आहे.  या चित्रपटाची प्रदर्शित होण्याआधीच भारतभर चर्चा सुरू आहे.

प्रभासने 'ईश्वर' या तेलुगू चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. यानंतर तो 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रिबेल', 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन', 'साहो' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. प्रभास ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभू  श्रीरामाच्या भूमिकेतही दिसलेला. त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या सर्व फेल ठरल्या. या सिनेमावर बरीच टिका झाली. पण प्रभासच्या कामाचे खूप कौतुकही झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story