रोमान्स करताना घबराट

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हा बाॅलिवूडमधील हाॅट ॲण्ड सेक्सी हिरोईन दीपिका पदुकोणसोबत ‘गहराईयां’ या चित्रपटात इंटिमेट सीन चित्रित करण्यापूर्वी घाबरला होता. त्या सीनसाठी पुढे कसे जायचे, ते समजत नव्हते. सिद्धांतची भीती इतकी वाढली की त्याचे वडील आणि करण जोहर यांना त्याचे सांत्वन करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 11:55 am
Entertainment news, Siddhant Chaturvedi, nervous before shooting, intimate scene, Bollywood, sexy heroine, sexy heroine, Gahraiyan,

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) हा बाॅलिवूडमधील हाॅट ॲण्ड सेक्सी हिरोईन दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) ‘गहराईयां’ या चित्रपटात इंटिमेट सीन चित्रित करण्यापूर्वी घाबरला होता. त्या सीनसाठी पुढे कसे जायचे, ते समजत नव्हते. सिद्धांतची भीती इतकी वाढली की त्याचे वडील आणि करण जोहर यांना त्याचे सांत्वन करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.

सिद्धांतचे वडील म्हणाले, ‘‘तुला एवढी घाबरण्याची काय गरज आहे? तू व्यावसायिक अभिनेता आहेस. हे तुझे काम आहे.’’ करण जोहरनेही सिद्धांतला हेच सांगितले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सिद्धांतला त्याच्या वडिलांसोबत बसून तो बघता आला नाही. सिध्दांतला वडिलांसोबत चित्रपट बघायला लाज वाटली.  

 ‘गहराईयां’ या चित्रपटात सिद्धांत आणि दीपिका पदुकोणमध्ये बरेच रोमँटिक सीन होते. दीपिका आधीच प्रस्थापित अभिनेत्री होती, तर सिद्धांत त्यावेळी नवोदित होता. या इंटिमेट सीनमुळे तो खूप घाबरला होता. याबाबत सिद्धांत म्हणाला, ‘‘त्यावेळी माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली. तुला मिळालेल्या संधीसाठी देशातील ९० टक्के जनता काहीही करायला तयार असेल. व्यावसायिक माणसासारखं वाग. हे तुझं काम आहे.’’ या चित्रपटातील सिद्धांत आणि दीपिका यांच्यातील बोल्ड सीनची बरीच चर्चा झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story