निक बनला नॅशनल जीजू !

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केले. अनेक वर्ष अनेकमेकांना डेट केल्यानंतर प्रियांका आणि निक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियांका हिच्यासोबत लग्न केल्यामुळे निक याला ‘नॅशनल जीजू’ म्हणून ओळख मिळाली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक याने ‘नॅशनल जीजू’ या ओळखीवर वक्तव्य केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 02:23 pm
Bollywood's famous and popular actress, Priyanka Chopra, nick jones, bollywood, National Jeeju, film industry

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केले. अनेक वर्ष अनेकमेकांना डेट केल्यानंतर प्रियांका आणि निक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियांका हिच्यासोबत लग्न केल्यामुळे निक याला ‘नॅशनल जीजू’ म्हणून ओळख मिळाली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक याने ‘नॅशनल जीजू’ या ओळखीवर वक्तव्य केले आहे.

सध्या सर्वत्र फक्त निक याने जीजू या शब्दावर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत निक याला, ‘तुला जीजू असे का म्हटले जाते आणि यावर तुझ्या काय भावना आहेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर निक म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे माझे लग्न प्रियांका चोप्रा हिच्यासोबत झाले आहे. आमच्या लग्नानंतर मला प्रत्येकाने मला जीजू असे म्हणायला सुरुवात केली आणि मी नॅशनल जीजू झालो आहे.

जीजू शब्दाचा अर्थ सांगत निक म्हणाला, ‘जीजू शब्दाचा अर्थ आहे मोठ्या बहिणीचा पती… याच नात्याने मी भारताचा मोठा भाऊ आहे, असेही निक म्हणाला. अनेक शोमध्ये देखील निक याचा उल्लेख ‘नॅशनल जीजू’ म्हणून केला जातो.  अमेरिकेतील एका टॉक शोमध्ये निक याने जीजू शब्दाचा अर्थ सांगत ‘मी भारताचा मोठा भाऊ आहे, असे म्हणाला. निक आणि प्रियांका चोप्रा यांचे २०१८ मध्ये लग्न झाले.

निक आणि प्रियांका यांनी जेधपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केले.  दोघांच्या लग्नाचे फोटो आणि  व्हीडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. निक आणि प्रियांका यांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न. लग्नानंतर प्रियांका पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. निक याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने सरोगसीच्या मदतीने लेक मालतीचे जगात स्वागत केले.  प्रियांका कायम लेकीसोबत फोटो आणि  व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story