नागार्जुनने होणाऱ्या सूनेलाच म्हटले ‘हॉट’!

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुदाचारी’ या चित्रपटाच्या ‘सक्सेस बॅश’मधील हा व्हीडीओ आहे. या व्हीडीओमध्ये नागार्जुन त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी बोलताना दिसत आहेत. सोभितानेही त्या चित्रपटात भूमिका साकारली होती. मंचावर नागार्जुन यांना जेव्हा सोभिताविषयी विचारले जाते. तेव्हा ते म्हणतात “ती खूप चांगली आहे. मी असे म्हणायला नको की, ती खरेच खूप हॉट आहे. तिच्यात असे काहीतरी नक्कीच आहे, जे इतरांना आकर्षित करते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 9 Aug 2024
  • 01:01 pm
Entertainment news, Bollywood, tollywood, Nagarjuna, new south movie, Sobhita

संग्रहित छायाचित्र

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाग चैतन्यने आज (८ ऑगस्ट) सकाळी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर  हैदराबादमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. नाग चैतन्यचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर सर्वांत आधी या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘सोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत’, असेही त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो तर व्हायरल होतच आहेत, पण त्याचसोबत नागार्जुन यांचा एक जुना व्हीडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुदाचारी’ या चित्रपटाच्या ‘सक्सेस बॅश’मधील हा व्हीडीओ आहे. या व्हीडीओमध्ये नागार्जुन त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी बोलताना दिसत आहेत. सोभितानेही त्या चित्रपटात भूमिका साकारली होती. मंचावर नागार्जुन यांना जेव्हा सोभिताविषयी विचारले जाते. तेव्हा ते म्हणतात “ती खूप चांगली आहे. मी असे म्हणायला नको की, ती खरेच खूप हॉट आहे. तिच्यात असे काहीतरी नक्कीच आहे, जे इतरांना आकर्षित करते. आता नाग चैतन्य आणि सोभिताच्या साखरपुड्यानंतर नागार्जुन यांचा हा व्हीडीओ खूप व्हायरल होत आहे.

त्यावरून नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ती वयाने लहान आहे, किमान विचार करून बोला’, असे एकाने लिहिले आहे . तर ‘हे शोभतं का’, असा सवाल दुसऱ्याने केला आहे. नाग चैतन्यने याआधी २०१७ मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते.  मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर  २०२१ मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचे नाव सोभितासोबत जोडले गेले.  नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकाळी पार पडला. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. या आनंदी जोडप्याला खूप शुभेच्छा. त्यांना आयुष्यभराचे प्रेम आणि आनंद मिळो.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story